ज्येष्ठ नागरिक बचत योजना/Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme- मित्रहो या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)आहे. या योजनेत फक्त साठ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना एक नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने 2004 मध्ये या योजनेची सुरुवात केली. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर चांगला निधी आपणास मिळतो.

योजनेचा कालावधी व गुंतवणुकीची रक्कम व व्याजदर-

जेष्ठ नागरिक बचत योजनेत पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो पण आणखी गुंतवणुकीचे वर्ष हे तीन वर्षापर्यंत वाढवू देखील शकतो. या योजनेअंतर्गत 1000 रुपये पासून जास्तीत जास्त 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.4% व्याज गुंतवणूकदारास मिळते.

14 लाख रुपयांचा लाभ-

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून 14 लाख रुपयांचा लाभ आपणास मिळवायचा असेल तर यासाठी आपणास या योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागणार आहे. आणि जर आपण या योजनेत पाच वर्षासाठी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर आपणास 14,28,924 रुपयांचा लाभ मिळेल.

खाते कसे उघडायचे-

या योजनेचा आपणास लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण जेष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते सहज उघडू शकता. खाते उघडण्यासाठी आपणास एक फॉर्म भरावा लागेल व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

कागदपत्रे-

  • ओळखीचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठीचे नियम-

या योजनेत मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी आहे, पण खाते उघडणे आणि पैसे काढण्याच्या कालावधीनुसार आपणास दंड लागतो. खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्ष पूर्ण होण्याआधी योजना बंद केल्यास आपणास ठेवीच्या 5 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाते. आणि खाते उघडण्याच्या दोन ते पाच वर्षाच्या दरम्यान योजनेतून बाहेर पडल्यास ठेव रकमेपैकी 1 टक्के दंड वसूल केला जातो.

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ?-

खाते परिपक्व होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाईल आणि सर्व रक्कम ही त्या खातेदाराच्या कायदेशीर वारसदार अस किंवा जो नॉमिनी असेल त्यांच्याकडे हस्तांतरित केली जाईल.

मित्रांनो या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा नक्की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सविस्तरपणे माहिती करून घ्यावी त्यानंतरच या योजनेमध्ये गुंतवणूक करावी तुम्हालाही योजना महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद…