काही शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा झाले.

प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन पेमेंटचा मेसेज आल्यावर सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्वासच बसला नाही. मात्र नंतर त्यांनी खाते तपासले असता खात्यात 6000 रुपये असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यावेळी त्यांच्या खात्यावर चार हजार रुपये पोहोचल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या वेळी ज्या शेतकऱ्यांचे 14 वे पेमेंट बाकी होते, त्यांना सरकारकडून 4 हजार रुपये मिळाले. सरकारने यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपये भरले आहेत.

जर तुम्हाला या वेळी 2000 रुपयांचे पेमेंट मिळाले नसेल तर तुम्ही पीएम-किसान हेल्पडेस्कद्वारे तक्रार दाखल करू शकता. याशिवाय, तुम्ही हेल्पलाइन क्रमांकांवर तक्रार नोंदवू शकता: 011-24300606 आणि 155261 किंवा टोल-फ्री क्रमांक 18001155266. तुम्ही तुमची तक्रार [email protected] किंवा pmkisan-funds@gov .in वर ईमेल करू शकता.