कागदपत्रे काय लागतात ? विद्यार्थिनीची ७५ टक्के उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत. मुदतीत सादर करायचा आहे. शाळेने पुढील वर्षापासून थेट विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.

विद्यार्थिनींसाठी चांगली योजना…. अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी ही चांगली योजना आहे. त्याचा नियमितपणे लाभ दिला जातो. योजनेचे अर्ज संस्थेने ऑनलाइन भरायचे आहेत.

शिष्यवृत्तीचे दोन स्लॅब, वार्षिक ६०० अन् एक हजार रुपये….

पाचवी ते सातवीतील प्रत्येक लाभार्थी विद्यार्थिनीला दर महिन्याला ६० रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी ६०० रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.

आठवी ते दहावीतील प्रत्येक लाभार्थी विद्यार्थिनीला दर महिन्याला १०० रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी १००० रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.

लाभार्थी विद्यार्थिनी विमुक्त जाती, भटक्या जमाती,

विशेष मागास प्रवर्गातील तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकणारी असावी. विद्यार्थिनी शासनमान्य शाळेत नियमित शिक्षण घेणारी असली पाहिजे.