७५ टक्के अनुदानावर मिळते दुधाळ जनावर

केंद्र शासनामार्फत या योनजेंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ५० टक्के अनुदान आहे. योजनेसाठी गेल्यावर्षीदेखील अर्जदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. उद्दिष्ट्य संख्या कमी असल्याने अनेक पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ घेता आलेला नव्हता.

ऑनलाइन अर्ज कोठे कराल?

या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, महाबीएमएस या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. महिनाभराच्या आत पशुसंवर्धन विभागाकडून पात्र अर्जदारांना दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते.

कधीपर्यंत अर्ज करता येणार?

९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. महिनाभर अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मागील वर्षी दाखल झालेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.