युनो बँकेने शेअर बाजाराला सांगितले की त्यांनी सक्रिय उपाययोजना केल्या आणि लाभार्थ्यांची खाती गोठवली आणि 820 कोटींपैकी 649 कोटी रुपये वसूल केले. चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या एकूण रकमेच्या हे अंदाजे 79 टक्के आहे. मात्र, हा तांत्रिक बिघाड मानवी चुकांमुळे झाला की ‘हॅकिंग’चा प्रयत्न झाला, हे युनो बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.