कोणाला मिळणार लाभ?

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि धनगर समाजातील असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जात प्रमाणपत्र असावे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न कमाल अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. इयत्ता बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे काय लागणार?

अर्जदाराने त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज कोठे करायचा?

महापालिका क्षेत्र, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे. योजनेचा अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो. राज्य शासनाकडून योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जाते.