त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, शेतीच्या सुधारित कामगिरीसह केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडवली खर्चामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे

केंद्राने आपल्या अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी ४९ टक्के तर राज्यांनी ३२ टक्के भांडवली खर्च केला आहे. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे आर्थिक निकाल पहिल्या तिमाहीप्रमाणेच मजबूत दिसत आहेत. त्याच वेळी, सेवा निर्यातीच्या सहाय्याने एकूण निर्यातीत सकारात्मक वाढ होत आहे आणि यामुळे दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीलाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.