निवृत्तिवेतनधारकांनाही लाभ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे.

ही वाढ १ जुलै, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर २०२३ च्या निवृत्तिवेतन व कुटुंब निवृत्तिवेतनासोबत देण्यात येणार आहे.

तसेच ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी- कृषितेर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही हा निर्णय राहणार आहे.