२.५७% वरून ३.६८%  सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७% आहे. ४,२०० ग्रेड पेमध्ये मूळ वेतन १५,५०० रुपये असेल, तर १५,५०० x २.५७ या हिशेबाने वेतन ३९,८३५ रुपये होईल.  आता फिटमेंट फॅक्टर वाढवून ३.६८ केला जाऊ शकतो. त्यामुळे किमान मूळ वेतन १८ हजारांवरून २६ हजार होईल. वेतन, तसेच भत्त्यांत वाढ होईल. मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी कर्मचायांकडून दीर्घकाळापासून केली जात आहे. ही मागणी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून २०२४च्या अर्थसंकल्पाद्वारे मान्य केली जाऊ शकते.