कशासाठी किती अनुदान?

रेशीम कीटक संगोपनगृह उभारणीसाठीच्या शेडसाठी ५०x२२ फूटचे संगोपनगृह उभारणी १ लाख ७९ हजार १४९ रुपयांचे अनुदान मिळणार. तुती लागवड, संवर्धन, कीटक संगोपनगृह मिळून शेतकऱ्यांना एकूण ३ लाख ९७ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकणार आहे.

तुती लागवडीसाठी कमीत कमी १ एकर व जास्तीत जास्त ५ एकर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. १ एकर तुती लागवड, संवर्धन व कोष उत्पादनासाठी २ लाख १८ हजार १८६ रुपयांचे अनुदान मिळते.

रेशीम समग्र – २ योजना

रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपन गृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती लागवड फळबागा, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टीएंड रिलिंग मशीनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.