अर्ज कसा व कोठे करायचा?

अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण | निदर्शनास आल्यापासून ३० दिवसात सादर करावा.

जिल्ह्यातील ५७ शेतकऱ्यांना १ कोटी १४ लाखांचे वाटप

या योजनेत एप्रिल २०२३ पर्यंत जळगाव जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या वारसांना १ कोटी १४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

देण्यात येणारे सानुग्रह अनुदान

अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी २ लाख रुपये. याशिवाय इतर प्रकरणातही अनुदान.