दिवाळीत अडीच लाखांचा महसूल एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या सर्व बसेसला ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे दिवाळीत प्रत्येक आगारातून मोठ्या संख्येने ऑनलाइन तिकिटांची बुकिंग झाली. यातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत सुमारे अडीच लाखांचा महसूल जमा झाला असल्याचे सांगण्यात आले.

२, ८४३ प्रवाशांचे ऑनलाइन तिकीट

जळगाव एसटी विभागातर्फे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी दिवाळीमध्ये एमएसआरटीसी या अॅपवर ऑनलाइन तिकीट सुविधा केली होती. त्यानुसार दिवाळीच्या सुट्टीच्या काळात २ हजार ८४३ प्रवाशांनी जळगाव विभागातील विविध आगारातून विविध मार्गावरील गाड्यांसाठी ऑनलाइन तिकीट काढले होते.

एमएसआरटीसीवर काढा ऑनलाइन तिकीट

एमएसआरटीसी या अॅपवर दोन महिने आधी ग्राहकांना तिकीट बुकिंग करता येत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी एसटी महामंडळाने एमएसआरटीसी हे अॅप विकसित केले आहे. मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करून, या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः ही प्रक्रिया अतिशय सुलभ असल्याचे सांगण्यात आले.