गेल्या वर्षात सर्वाधिक घोटाळे उघडकीस

वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वाधिक डिजिटल पेमेंट घोटाळे उघड झाले. आरबीआयच्या वार्षिक अहवालात आलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ मध्ये एकूण १३,५३० घोटाळे उघडकीस आले.

त्यात ३०,२५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली. अलीकडेच युको बँकेने आपल्या खातेदारांच्या खात्यांत आयएमपीएसच्या माध्यमातून ८२० कोटी रुपये जमा केले होते.