ई- श्रम पोर्टलवर नोंदणी कशी कराल?

वेबसाइटवर उजवीकडे तुम्हाला रजिस्टर नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे सेल्फ रजिस्ट्रेशन या रकान्यात आधारशी लिंक मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

नोंदणीसाठी निकष काय?

स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, घरगुती कामगार, दुधवाला, स्थलांतरित कामगार, ट्रकचालक, मच्छीमार, कृषी कामगार आणि तत्सम इतर कामगार या योजनेसाठी आपली नोंदणी करू शकतील. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचा लाभ घेणारे कर्मचारी व कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा लाभ घेणारे कर्मचारी यासाठी पात्र नसतील.

‘ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यावर संबंधितांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकणार आहे.करू शकतो.