पगारवाढीसह शनिवारची सुट्टी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बँकांमध्ये 5 दिवस काम करण्याच्या निर्णयासह सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 20 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला सरकार मंजुरी देऊ शकते. महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सुट्टी असेल. 12 व्या द्विपक्षीय वेतन वाढ करारावर बँक असोसिएशन आणि IBA यांच्यात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पगारवाढीसोबतच बँकांमध्ये कामाचे पाच दिवस आणि शनिवार एक सुट्टी एकाच वेळी जाहीर केली जाऊ शकते.

8.50 लाख कर्मचाऱ्यांना पगारवाढ अपेक्षित आहे

सरकारी बँक कर्मचार्‍यांचा सध्याचा पगार करार १ नोव्हेंबर २०२२ रोजी संपला. त्यामुळे पगारवाढीवर एकमत होण्यासाठी युनियन आणि IBA यांच्यात चर्चा सुरू आहे. देशातील 8.50 लाखांहून अधिक बँक कर्मचारी पगारवाढीच्या गुड न्यूजच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारला लोकसभा निवडणुकीपूर्वी पगारवाढीचा निर्णय घ्यायचा आहे.