Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

1. खरेदी खत

जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो. तो म्हणजे खरेदी खत. Maharashtra Land Right Proofs

खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.

2. सातबारा उतारा

शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

3. खाते उतारा किंवा 8-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. Maharashtra Land Right Proofs

या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.

8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते.

4) जमीन महसूल पावती

शेतकरी दरवर्षी आपल्या शेत जमिनीचा महसूल भरत असतो. हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून पावती पुरावा घेऊन येतात तोच पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक पुरावा आहे. Bhoomi Land Record

5) जमीन मोजणी केलेला नकाशा

हा नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते. Maharashtra Land Right Proofs

6) प्रॉपर्टी कार्ड

शेतकरी मित्रांचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड हे असणे शेतकरी मित्रांसाठी आवश्यक आहे.

7) संबंधित जमिनीचे खटले

शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जबाबाच्या प्रति निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे. Bhoomi Land Record