गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा ?

मालकाचा पत्ता व नाव चेक करण्यासाठी मोबाईल मध्ये एक ऍप डाऊनलोड करणं आवश्यक आहे. MParivahan app असे त्या ऍपचे नाव आहे. या ऍपद्वारे कोणत्या देखील गाडीची संपूर्ण माहिती काढता येणार आहे.तसेच, गाडीच्या अधिकृत वेबसाइट Parivahan.gov.in वर जाऊन देखील गाडीची संपूर्ण माहिती मिळू शकते. Vehicle Owner Information ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर RC Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या ‎‫पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक पेज दिसेल. त्यानंतर ज्या गाडीचा संपूर्ण माहिती जाणून घेण्याची आहे त्या गाडीचा नंबर टाकणं आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे, तेथे दिलेला कॅप कोड प्रविष्ट करा, वाहन शोध पर्यायावर क्लिक करा आणि नंतर आपण वाहन क्रमांक प्रविष्ट केला असेल तर त्या वाहनाची संपूर्ण माहिती समोर दिसेल.