या भरती प्रक्रियेत विद्युत विभागात 40 तर वायरिंग विभागात 40 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्यस्थळ हिंगोली असेल. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर, उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 15 जानेवारी 2024 रोजी विद्युत भवन विभागीय कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला मूळ अर्ज सोबत ठेवावा लागेल. जे खरोखर नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2024 आहे.