कृषी मंत्रालयांच्या माध्यमातून जी रक्कम शेतकऱ्यांना दिली जात होती पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति महिना 500 रुपये म्हणजेच प्रति 4 महिन्यांमध्ये 2000 रुपये याप्रमाणे आता यामध्ये वाढ करून प्रति महिना 750 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते म्हणजेच प्रति 4 महिन्यांमध्ये 3000 रुपये याप्रमाणे वार्षिक 9 हजार रुपये….

PM Kisan योजनेला 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात पाच वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणूनच शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत पुढील वर्षांमध्ये वाढ दिली जाऊ शकते अशी दाट शक्यता कृषी तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

ही माहिती कोणी दिली?

कृषी मंत्रालय एक्सपर्ट कमिटीचे सदस्य आदित्य शेष यांचे सांगणे आहे की महागाई आणि सध्याचे मौसम उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे.

गहू-तांदूळ यांची सुद्धा एमएसपी वाढवणे व पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अनुदान वाढ करण्याचा विचार चालू आहे. कृषी क्षेत्र दरवर्षी 4 टक्के ने सतत विकास दर वाढ होत चालला आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जे मदत सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे त्या मदतीमध्ये वाढ करण्याची तयारी केंद्र सरकारची चालू आहे…