ई-केवायसी करणे बंधनकारक उज्ज्वला योजनेसाठी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे ओळखपत्र असायला हवे. आधारकार्ड अनिवार्य आहे.

उज्ज्वला’चे अनुदान किती?

लाभार्थीसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढविले आहे. यापूर्वी एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. तर आता उज्ज्वला लाभार्थीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होईल.