नवीन व्याजदर कधी लागू होणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी नवीन व्याजदर लागू केला आहे. 10 जानेवारी 2024 पासून सामान्य लोकांना 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याजदर मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.

व्याजदरांची नवीन यादी पहा

७ दिवसांपासून १४ दिवसांच्या एफडीवर ३.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

१५ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

४६ दिवसांच्या एफडीवर ४.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

६० ते ९० दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

180 ते 270 दिवसांच्या FD वर 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

२७१ दिवस ते ३६४ दिवसांच्या एफडीवर ६.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.