कागदपत्रे सादर केल्यानंतरच मिळणार नोंदणी क्रमांक

प्रकल्प नोंदणीसाठी बिल्डरांना ऑनलाइन कागदपत्रे सादर करायची आहेत. कागदपत्रे अपुरी असल्यास ई-मे- लद्वारे ‘महारेरा’ तर्फे अवगत केले जाते. संपूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतरच बिल्डरला नोंदणी क्रमांक दिला जातो.

घर खरेदी करतांना प्रकल्पाची परवानगी, तसेच महारेरा नोंदणी नंबर मिळाला आहे का, याची तपासणी करा.

नोंदणी क्रमांक पाहा, मगच घर घ्या….

२ प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक पाहूनच मगच ग्राहकांनी घर खरेदी करावे, असे आवाहन ‘महारेरा’कडून केले जात आहे.

‘महारेराकडे प्रकल्पाची संपूर्ण परिपूर्ण कागदपत्रे दिल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. २०२३ च्या नवीन मुद्रांक नियमानुसार काही कागदपत्रे अपूर्ण असतील, तर शासनाकडे ठराविक फी भरुन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे; मात्र याबाबत अनेकांना माहिती नाही. प्रमाणपत्र नसताना मालमत्ता विक्री करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असे रेराने स्पष्ट केले आहे.