या नवीन प्रणालीमुळे तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरी तुम्ही पेमेंट करू शकाल मात्र तुम्हाला तुमचे खाते UPI शी लिंक करावे लागेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, UPI नेटवर्क वरून ग्राहक पेमेंट साठी बँकांनी दिलेली क्रेडिट देखील वापरू शकतात. थोडक्यात क्रेडिट कार्ड सारखी ही सुविधा असणार आहे तुम्ही आधी पेमेंट करायचे आणि नंतर बँक खात्यावरून पैसे वजा केले जाणार आहेत.. UPI News India या नवीन प्रणालीमुळे बँकांच्या ऑफरिंग कॉस्ट मध्ये घट होईल आणि बँकांसोबत क्रेडिट उत्पादनांच्या नावीन्यपूर्ण पद्धततिचीही मदत होईल. या यावर रिझर्व बँकेने स्वतंत्रपणे तपशीलवार माहिती देखील जारी केली आहे. त्यासोबतच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पेमेंट मध्ये क्रेडिट वापरण्याची सुविधाही मिळणार आहे.

क्रेडिट कार्डची संख्या कमी करून लोकांना UPI द्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. UPI द्वारे ग्राहक बँकेच्या क्रेडिट लाईन चा वापर करू शकतील. क्रेडिट लाईन ग्राहकांच्या बँक खात्याची लिंक केली जाईल. UPI Transaction News.

  ग्राहकांना काय फायदा होणार?

भारतीय रिझर्व बँकेच्या या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना आता वेगळे कार्ड बाळगावी लागणार नाही. फक्त तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहात. यामुळे तुमच्या वेळेचीही बचत होणार आहे. त्यासोबतच क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो,पण अप्रू झाल्यानंतर लगेच क्रेडिट लाईन उपलब्ध होईल. पॉईंट-ऑफ-परचेस-क्रेडिट एक्सपिरीयन्स कोणत्याही अडथळ्याशिवाय असेल त्यामुळे BNPL क्षेत्रामध्ये जलद वाढ होऊ शकते.

कशी मिळणार क्रेडिट लाईन?

प्रत्येक UPI युजर ची क्रेडिट लाईन वेगवेगळी असेल. UPI क्रेडिट मिळण्यासाठी बँका आणि पेमेंट एप्लीकेशन ग्राहकांचे उत्पन्न, कर्ज परतफेड करण्याची क्षमता या बाबींचा आढावा घेऊनच प्रत्येक ग्राहकाची क्रेडिट लाईन ठरवतील. या नवीन प्रणालीमुळे UPI ओव्हरड्राफ्ट किंवा क्रेडिट कार्ड सारखी सुविधा उपलब्ध होईल.

..