एक राष्ट्र एक शिधापत्रिका

आता रेशन कार्ड धारकांना कार्ड नसले तरीही रेशन मिळणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत अन्नधान्याचे वितरण आता सर्व ई-पीओएसद्वारे केले जात आहे. दिल्ली सरकारकडून देखील हाच फॉर्म्युला वापरला जात आहे.

यासाठी मात्र तुमचे रेशन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला रेशन कार्ड नसताना देखील मोफत रेशनचा लाभ दिला जाईल. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकंना रेशन घेणे सोपे झाले आहे.

जर तुमची प्रकृती ठीक नसेल किंवा तुम्ही रेशन घेण्याच्या वेळी तुमच्या घरी नसाल तर तुमच्या जागी तुमच्या कुटुंबातील सदस्य जाऊन रेशन घेऊ शकतात. त्यामुळे आता तुमचे रेशन न मिळण्याची भीती नाही.

सध्या नागरिकांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार २०२४ पर्यंत मोफत रेशनचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. लोकसभा निवडणूक पाहता केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे