सरकार कडून एक आठवड्याचे अभियान

कृषी मंत्रालयानुसार, 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येउल

हप्ता बंद होण्याचे कारण काय

शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची दोन महत्वाची कारणे आहेत.
पहिले कारण e-kyc संबंधीचे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन घ्या
बँक खाते आधार कार्डशी लिंक न केल्याने हप्ता बंद झाला असेल 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान अभियान सुरु असेल.
सेवा केंद्रावर हे अभियान चालविण्यात येईल, त्याठिकाणी समस्या सोडविण्यात येईल जिल्हा प्रशासन याविषयीची माहिती देणार आहे.समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना थांबलेल्या हप्त्याची रक्कम पण मिळेल.
तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल धन्यवाद