मालमत्ता पत्रक साठीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक होय. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता.

मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या ७/१२ उताऱ्यावर आपल्या शेतजमिनी संबंधित सर्व माहिती असते, त्याच प्रमाणे एखादया व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे? याची माहिती देखील आपल्याला मिळू शकते. त्यासाठी सरकारने स्वामित्व योजना आणली होती. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या जमिनीचे व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहेत. म्हणजेच बिगर शेत जमीन असलेल्या ठिकाणी व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे याची माहिती त्यात नमूद केलेली असते.

शेतकरी पहिले आपल्याला सातबारा उतारा किंवा फेरफार दुरुस्ती आहे नाहीतर मदतीसाठी तलाठेकडे जाण्याची गरज होती. परंतु महाराष्ट्र शासनाच्या या नवीन संकेतस्थळावर तुम्ही ही सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यामुळे आपल्याला तलाठ्याकडे ज्या चक्रा माराव्या लागत होत्या आणि त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता ते आता वाचणार आहे. Bhumiabhilekh Land Record

Bhumiabhilekh Land Record

डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा