मुभा रद्द करण्याच्या मुद्दावर जिल्हे ठाम

मागील महिन्यातील धान्य पुढील महिन्यात घेण्याची मुभा रद्द करण्याच्या मुद्द्यावर अनेक जिल्हे ठाम होते. त्यामुळे शिल्लक धान्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे संबंधित महिन्याचे वितरण वाढून ग्राहकांनाही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेऊन जाण्याची सवय लागणार आहे.

शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली शिल्लक धान्याचा काळाबाजार काही दुकानदार करीत होते. त्याला या पद्धतीमुळे आळा बसणार आहे; शिल्लक धान्याचा हिशोब ठेवण्यातही अडचण येणार नाही.

सोपे झाले होते. मात्र, यामुळे शिल्लक यांची बेरीज, वजाबाकी करण्याचे काम धान्याचा माठा आणि अतिरिक्त विक्रेत्यांना करावे लागत होते.

गोडाऊनमधून झालेली उचल व रेशन दुकानातून झालेली वाटपाची नोंद ऑनलाइन प्रणालीत नोंदविली जाते. त्यामुळे मुदतीत रेशन वाटल्यानंतर ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिल्लक साठाही सहज कळणार आहे. त्यामुळे गैरप्रकार नक्कीच टळतील.