तुमचा सिबिल स्कोर काही कारणामुळे खराब झाला असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सुधारू शकता.

१) कर्जाचे हप्ते वेळेवर भरा – Pay Bill On Time : तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल आणि त्याचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डची बिले वेळेवर न भरणे ही खूप मोठी चूक आहे. यामुळे तुमच्या Credit Score वर वाईट परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यासाठीच सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते आणि क्रेडिट कार्डचे वेळेवर भरायची सवय लावून घ्या. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर वाढण्यास मदत होईल.

२) थकबाकी ठेवू नका : तुमच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डची थकबाकी रक्कम वेळेत भरून तुम्ही Credit Score सुधारू शकता. त्यासोबतच कोणत्याही कर्जाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कर्ज वेळेवर भरा.

३) तुमच्या क्रेडिट अहवालातील उणीव तपासणी करा : आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित Credit Score चे परीक्षण करा. जर आपल्याला रिपोर्ट मध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे.

४) एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा : तुम्ही एकाच वेळी अनेक कर्ज जर घेत असाल तर, असे करणे तुमचाCredit Score कमी करू शकते. एकाच वेळी आपण जर अनेक कर्ज घेत असू तर ते असे सूचित करते की ,ते सर्व भेटण्यासाठी तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे. त्यासोबतच एकाच वेळी आणि कर्जाचे हप्ते नियंत्रित करता करता आपली आर्थिक स्थिती ढसाळू शकते.

५) कर्जाचा कालावधी जास्तीचा निवडा : आपण कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले असेल तर त्याचा कालावधी हा जास्तीचा निवडा. त्याच्यामुळे तुमच्या ईएमआय कमी होईल आणि तुम्ही वेळेवर सर्व पेमेंट सहज करू शकता. आणि यामुळे तुमचा CIBIL Score वाढण्यास मदत होईल.

६) तुमचे क्रेडिट कार्ड मर्यादित वापरा : तुमच्या क्रेडिट कार्ड वरील मर्यादा संपूर्ण न वापरणे हा तुमचा चांगला करण्यासाठी चा एक महत्त्वाचा पर्याय आहे. दर महिन्याला तुमच्या क्रेडिट लिमिट पेक्षा फक्त 30 ते 40% Credit Score खर्च केल्याने तुमचा क्रेडिट स्कोर स्थिर राहण्यास मदत होते. क्रेडिट लिमिट एवढा जर तुमचा खर्च होत असेल, तर तुमचा सिबिल स्कोर कमी होण्यास हे सुद्धा कारण असू शकते.

७) तुमची क्रेडिट मर्यादा वाढवा : तुम्ही तुमच्या कर्जाचे एमआय किंवा क्रेडिट कार्डची वेळ वेळेत भरल्यावर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढण्यास सुरुवात होते. केव्हा बँक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून देते. यामुळे तुम्ही दर महिन्याला जास्त पैसे खर्च करत असताना सुद्धा तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याबाबत हुशार असणे गरजेचे आहे.

८) विविध प्रकारच्या क्रेडिटची निवड करा : ज्या व्यक्तीने कधीही कोणत्याही प्रकारची क्रेडिट केव्हा कर्ज घेतलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरलेले नसते त्यांचा Credit Score म्हणजे सिबिल स्कोर सामान्यतः कमी असतो. त्यामुळे त्यांना कर्ज मिळणे सुद्धा थोडे कठीण असते. तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये वैयक्तिक आणि सुरक्षित कर्ज तसेच दीर्घ आणि अल्पमुदतीच्या कर्ज घेऊन तुमचा सिबिल स्कोर वाढवू करू शकता.

९) संयुक्त खातेदार टाळा : जर समजा तुमचे संयुक्त खाते असेल आणि त्याचा कर्जाचा व्यवहार खराब असेल तर, त्याच्यामुळे तुमची ही क्रेडिट हिस्ट्री खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो संयुक्त खातेदार होणे टाळा.

१०) जास्त व्याजाचे कर्ज लवकर फेडा : तुम्ही जर दोन-तीन प्रकारचे कर्ज घेतले असेल, तर जास्त व्याजदर असलेले कर्ज पहिल्यांदा फेडण्यास प्राधान्य द्या. यामुळे तुमचा जास्त व्याजदरासाठी जाणारे पैसे वाचू शकतात. किंवा तीन वेगवेगळे कर्ज घेण्यापेक्षा एकच मोठे कर्ज घ्या. आणि ३ लोन क्लिअर करा. कदाचित त्या एकाच कर्जाचा हप्ता तुम्ही फेडत राहणं हेच जास्त सोपं आणि परवडणारे असू शकते. माझा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

तर मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे जर पाडल्या तर तुमचा Credit Scoreसिबिल स्कोर नक्कीच चांगला राहण्यास मदत होईल. शिवाय तो वाढायला सुद्धा मदत होईल. आणि जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला हव्या तितक्या रकमेचे कर्ज बँकांकडून मिळू शकते.