आपल्या पीएफ खात्यातील पैसे काढण्याचे नियम आणि आपण पीएफ खात्यातील रकमेच्या किती टक्के रक्कम काढू शकतो हे सर्व माहिती आता आपण पाहिली. आता आपण पाहूया की, आपल्या पीएफ खात्यातून ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे काढायचे.? PF Detail In Marathi

यासाठी सर्वप्रथम EPFO च्या सदस्य पोर्टलवर जावे लागेल.

👉 अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ 👈

येथे तुम्हाला तुमचा युएएन क्रमांक आणि पासवर्ड भरावा लागेल.

नवीन पेजवर ऑनलाईन सेवा वर जा. येथे ड्रॉप डाऊन मेनू मधून क्लेम फॉर्म-३१,१९ आणि १०c निवडा.

आता येथे एक नवीन पेज उघडेल तेथे तुम्हाला बँक खाते क्रमांकाची पडताळणी करावी लागेल.

खाते क्रमांक पडताळणी झाल्यानंतर certificate of undertaking उघडेल जे एक्सेप्ट करा.

आत्ता Process for 0nline Claim या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, तेथे I want to apply for समोरील ड्रॉप डाऊन मधून PF ADVANCE (Form-31) निवडा. PF Detail In Marathi

आता येते तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि आवश्यक असणारे रक्कम विचारले जाईल.

त्यानंतर चेक बॉक्स मार्क केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने क्लेम करून तीन दिवसात आपल्या पीएफ खात्यातील रक्कम बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता.