बनावट खते ओळखण्याची पद्धती

डीएपी खत ओळखण्याची पद्धती

शेतकरी मित्रहो, डीएपी हे खत शेतासाठी खूप आवश्यक असते. डीएपी खताचे दाणे हे कडक,दाणेदार आणि बदामी रंगाचे असतात. त्यांना जर आपण नखाने दाबून फोडायचा प्रयत्न केला तरी ते फुटत नाहीत.Duplicate fertilizer Checking Tricks

त्यांची योग्य प्रकारे तपासणी करण्यासाठी त्याचे काही दाणे आपल्या तळहातावर घ्या आणि त्याचे चुना लावून तंबाखू सारखे हातावर माळा. डीएपी मधून एक तीक्ष्ण /उग्र वास येईल जो वास नाकाला सहन होणार नाही, आणि जर असा वास आला तर ते डीएपी खत खरे आहे असे समजा.

तसेच डीएपी खताचे काही दाणे गरम तव्यावर टाका. ते दाने तव्यावर मक्यासारखे फुलू लागले की ते खरे आहेत असे समजावे. आपण अशा प्रकारे डीएपी या खताची तपासणी करू शकतो.

युरिया खत ओळखण्याची पद्धती

शेतकरी मित्रहो, आपल्याला माहीतच आहे की,युरिया खताचे दाणे पांढरे, चमकदार आणि एकसारखे गोल आकाराचे असतात. हे दाणे पाण्यामध्ये टाकल्यावर थोड्या वेळामध्ये लगेच विरघळतात. आणि ते युरिया टाकलेले पाणी थंडगार होते.

त्याचबरोबर युरिया खताचे काही दाणे गरम तव्यावर टाकावे. थोड्यावेळाने ते दाणे तव्यामध्ये पूर्णपणे विरघळतात आणि थोड्यावेळामध्ये पूर्ण नष्ट होऊन जाते.Duplicate fertilizer Checking Tricks

सुपर फॉस्फेट ओळखण्याची पद्धती

हे खत सुद्धा डीएपी खतासारखेच काळे आणि बदामी रंगाचे दाणे असतात. काही वेळा आपल्याला सुपर फॉस्फेट च्या नावाखाली डीएपी खताची विक्री केली जाते. सुपर फॉस्फेट खताची तपासणी करण्यासाठी या खताचे काही दाणे गरम तव्यावर टाकावे. त्यानंतर तव्याला कितीही उष्णता दिली तरी हे दाणे फुलत नाहीत. अशाप्रकारे आपण योग्य खतांची पारख करून शेतामधील उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो.