बँकेत किती खाते उघडता येतात?

आपण कोणत्याही बँकेमध्ये बचत खाते कितीही उघडू शकतो. परंतु त्या बँक खात्यामध्ये किमान शिल्लक असणे आवश्यक असते. तरच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाण्यास वेळ लागणार नाही. पगार खाते ओळखता बहुतेक सर्व बँकांना बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक असते. म्हणजेच दर महिन्याला तुमच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.Bank Account Updateअसे तुम्ही न केल्यास बँक तुमच्या खात्यातून त्यासाठीचे शुल्क कापते.

किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे.

तुमची एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तर तुम्हाला अनेक शुल्क भरावे लागतील. जसे की मेंटेनन्स चार्ज क्रेडिट कार्ड चार्ज सर्विस चारसह अनेक शुल्क भरावे लागतील. या उलट तुम्ही जर एकाच बँकेत खाते ठेवले तर तुम्हाला एकाच बँकेचे शुल्क भरावे लागेल आणि तुमच्या पैशांची बचत सुद्धा होईल.

आवश्यकता असेल तरच बँक खाते उघडा

सर्व बँकांमध्ये मेसेज म्हणजे संदेश सेवा चालू ठेवण्यासाठी तुमच्याकडून काही प्रमाणात दर महिन्याला एक निश्चित रक्कम आकारले जाते. त्यासोबतच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांचे मेंटेनन्स चार्ज आणि मिनिमम म्हणजेच किमान शिल्लक रक्कम बँक खात्यामध्ये ठेवणे अनिवार्य आहे. त्यासाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच अधिक बँक खाते उघडा.

✒ Best FD Interest Rate : या बँक देत आहेत फिक्स डिपॉझिट (FD) वर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, पहा कोणत्या आहेत बँक

एकापेक्षा अनेक खाते असेल तर अशा प्रकारे करा बंद

तुमचे जर एकापेक्षा अनेक बँक खाते असतील आणि तुम्हाला अतिरिक्त असलेले बँक खाते बंद करायचे असेल, तर तुम्हाला डी-लिंक केलेला फॉर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेतून खाते बंद करण्याचा फॉर्म भरून सबमिट करावा लागतो त्यानंतर तुमचे खाते बंद होते. तुमच्यासाठी अनावश्यक असलेली म्हणजेच वापरात नसलेली बँक खाते बंद करणे हे खूप आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही

अधिक माहिती येथे वाचा ⩥⩥⩥⩥

सिबिल / क्रेडिट स्कोर ला धोका

तुमचे जर एकापेक्षा जास्त बचत खाते असतील, तर प्रत्येक बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे हे अनिवार्य असते. त्यामुळे तुम्हाला हे करणे अडचणीत आणू शकते. अशा परिस्थितीत एकाच डिफॉल्ट मुले दंड सुद्धा होऊ शकतो जो थेट आपल्या सिबिल स्कोर शी संबंधित असतो. त्यामुळे आपला सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.

तर मित्रांनो तुमचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असतील, आणि त्यांचा तुम्हाला वापर होत नसेल, तर ती आता लगेच बंद करा. आणि आपल्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या.