आयुष्मान कार्डधारकांसाठी खुशखबर.! मिळणार आयुष्मान योजनेअंतर्गत साडेसात लाख रुपये पर्यंत मोफत उपचार?

नमस्कार मित्रांनो निवडणुकीपूर्वी सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सरकार आरोग्य विमा कव्हरेज वाढवू शकते. सध्या, सरकार उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देते.

आता सरकार आरोग्य विमा संरक्षण 50 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या सूचना सरकारला अर्थसंकल्पात देण्यात आल्या आहेत. सरकारने आरोग्य विमा कव्हरेज 50 टक्क्यांनी वाढवल्यास हा विमा 7.50 लाख रुपयांपर्यंत वाढेल. मनी कंट्रोलने ही माहिती दिली आहे.

 

1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात मोदी सरकार ही घोषणा करू शकते. आयुष्मान भारत विम्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय 2024 च्या अर्थसंकल्पात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

आयुष्मान भारत योजना काय आहे?

आयुष्मान भारत ही मोदी सरकारची प्रमुख योजना आहे. जन आरोग्य योजना किंवा PM-JAY ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक आहे. PMJAY आरोग्य कवच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कुटुंबांसाठी आणि 16 ते 59 वर्षे वयोगटातील कुटुंबांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

👉 इथे क्लिक करून बघा आयुष्मान भारत योजना ला अर्ज कसा करायचा 👈

Leave a Comment