फक्त १०० रुपयात जमीन नावावर करण्याची कायदेशीर पद्धत जाणून घ्या. इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता वडिलोपार्जित जमीन अथवा संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही, असा शासनाचा नवीन शासन निर्णय GR आलेला आहे. जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र Land Record आता फक्त शंभर रुपयांमध्ये करता येणार आहे. यासंबंधीची सर्व माहिती आजच्या या लेखात आपण पाहूया.

Land Record : वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे एक आदेश जारी करण्यात आला आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत. आणि हे फक्त १०० रुपयांमध्ये करता येणार आहे.

वडिलोपार्जित जमीन फक्त शंभर रुपयात नावावर करण्यासाठी असा करा अर्ज इथे बघा

Leave a Comment