मोदी सरकारने दिली खुशखबर.! आता इतके दिवस मिळणार गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त

नमस्कार मित्रानो नुकताच केंद्र सरकारने सामान्य ग्राहक आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडर ९०० रुपयांना मिळत असले तरी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ते स्वस्तात मिळत आहे. आता 12 सिलिंडरसाठी 300 रुपयांची सबसिडी पुढील वर्षापर्यंत सुरू राहणार आहे.

हे सुद्धा बघा हे कार्ड असेल तर मिळणार मोफत पाच लाख रुपये पर्यंत उपचार

 

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ केलेली नाही. 14.2 किलो घरगुती गॅसची किंमत तूर्तास वाढलेली नाही. उलट 300 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मार्च महिन्यात 100 रुपयांनी कपात केल्यानंतर आता गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये झाली आहे. चालू आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत लाखो लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळेल. हे अनुदान 300 रुपये असेल. सबसिडीचा लाभ वर्षभरात फक्त 12 सिलिंडरसाठीच मिळणार आहे.गेल्या मार्च महिन्यात, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होती. आता ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे

अर्थात, अनुदानाचा लाभ घेण्यासाठी उज्ज्वला योजनेशी संबंधित असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, उज्ज्वला योजनेचे देशात 9 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत.

Leave a Comment