शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज.! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले हेक्टरी 20 हजार रुपये, इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो सरकारने रुपये बोनस जाहीर केला होता. जिल्ह्यातील १ लाख २० हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३३.७१ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आहेत. लागवड, खते, बी-बियाणे, मजूर आणि मशागतीचा खर्च वाढल्याने भातशेती अव्यवहार्य झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उत्पादन खर्चानुसार धानाचा हमी भावही कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा आता घरबसल्या मिळणार कॅश पैसे एटीएम मध्ये जाण्याची गरज नाह

 

केंद्र सरकारची आधारभूत किंमत योजना आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यातील बिगर आदिवासी भागातील जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील सब-एजंट संस्थांमार्फत शासकीय हमी दराने धानाची खरेदी केली जाते. बोनस-शेतकरी- गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून विविध संकटांना तोंड देत आहेत. राजकीय पक्ष, नेते, सेवाभावी संस्था, शेतकऱ्यांनी धान उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी शानाकडे केली होती. सरकारने ही मागणी मान्य करत 2 हेक्टर मर्यादेत 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस देण्याचा निर्णय घेतला. 26 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीव्यतिरिक्त रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून 239 कोटी 33 लाख 56 हजार 780 रुपये प्राप्त झाले. बोनस-किसान-गोंदिया 8 एप्रिलपर्यंत सुमारे 1 लाख 19 हजार 751 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 233 कोटी 70 लाख 98 हजार 280 रुपये जमा झाले. उर्वरित 3080 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 56258500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले.

Leave a Comment