या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना मिळाले 1 कोटी रुपये, तुम्ही पण केला आहेत का या योजनेला अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व येते. यामुळे शेतकऱ्यांच्या कुंटूबियांना अडचणींना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शासनाकडून राबविण्यात येते.

शासनाने २०१६ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती. या योजनेत शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करुन शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरु केली आहे.

काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना?

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करुन संकटातून बाहेर काढणारी ही योजना आहे.

शेतकरी अपघात विमा योजना

कशासाठी मिळते मदत?

अपघात: रस्ते, रेल्वे किंवा इतर अपघाती मृत्यू, अपघातामुळे आलेले अपंगत्व यासाठी शासनाकडून मदत मिळते.

पाण्यात बुझ्न : नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पाण्यात बुडून, नदी, नाल्यात बुइन मृत्यू झाला तरी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळते.

सर्पदेश: शेतात काम करत असताना, शेतकऱ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू होण्याची भीती असते. या योजनेत यासाठीही मदत दिली जाणार आहे.  विंचूदंश: विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू झाला तरी मदत

विजेचा धक्का : शेतामध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यास, जंतुनाशके हाताळताना मृत्यू झाल्यास

नैसर्गिक आपत्ती : वीज पडून, पुराच्या पाण्यात वाहून, वादळ, अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू झाल्यास.

👉 अर्ज कशाप्रकारे करायचा व कुठे करायचा इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment