शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! हरभरा पेरण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना मिळणार हरभरा पेरण्यासाठी अनुदान.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत असून, रब्बी हंगामातील हरभरा, रब्बी बाजरी व गहू बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मिळणार ५० टक्के अनुदान

रब्बी हंगामसाठी मिळणारे अनुदान हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षांआतील वाणास २५ रुपये प्रतिकिलो.

रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षाआतील वाणास ३० रुपये प्रतिकिलो. गव्हाच्या बियाणासह इतर बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

कृषी विभागाच्या अन्नसुरक्षा अभियान कार्यक्रमाअंतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी बाजरी व गहू बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना खरीप हंगामात देखील उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी राबविली जाते.

२ लाख २७ हजार हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र घटणार आहे. गेल्यावर्षी २ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड करण्यात आली होती. यंदा २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार असून, जिल्ह्यात हरभरा लागवड सुरु झाली आहे.

अनुदान

रब्बी पिकांसाठी दरवर्षी अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत बियाणांवर ५० टक्के अनुदान दिले जाते. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा.

👉 अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment