राज्य सरकारचा मोठा निर्णय.! पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती, इथे बघा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली असून, या अंतर्गत ६०० रुपयांपासून ते १ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आहे.

यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून

शिष्यवृत्ती दिली जाते.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी ही योजना राबवली जाते. आर्थिक स्थितीअभावी अनेक मुली इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची शिक्षणातील गळती रोखण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान असलेली ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचा लाभ नियमितपणे देण्यात येत असतो.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ?

राज्य सरकारने इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत दर महिन्याला ६० व १०० रुपये लाभार्थी विद्यार्थिनीला देण्यात येतात.

कोण कोणते कागदपत्र लागतील बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment