रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर.! घरबसल्या मिळणार आता मोफत रेशन कार्ड असा करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागते. शिवाय एजंटांकडून जास्तीचे पैसे घेतल्यास रेशनकार्ड मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे एजंट तसेच सरकारी कार्यालयातून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोफत रेशनकार्ड ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. ‘सरकारी काम करा आणि सहा महिने थांबा’ ही खेळी सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयात काम करताना अनुभवायला मिळते. सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठी तहसील कार्यालय, मंडळ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी त्यांची खंडणी करण्यात आली. अनेकांनी तहसील व मंडळ कार्यालयात रेशनकार्डसाठी दुकाने उघडली होती. एजंटांना देण्याचे पैसे देईपर्यंत रेशनकार्डे दिली जात नव्हती. त्यामुळे शिधापत्रिका कार्यालयातून एजंटांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. 20 रुपयांना मिळणाऱ्या रेशनकार्डसाठी नागरिकांना 2000 रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत होती.

हे सुद्धा वाचा आता पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये जाण्याची गरज नाही घरबसल्या मिळणार पैसे

 

अंत्योदय अन्न योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची प्राधान्य कुटुंब योजना; तसेच राज्य योजनेतील सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-रेशन कार्डची सुविधा मोफत दिली जाईल. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार पडताळणी केल्यानंतर योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-रेशन कार्ड दिले जाईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून हे ई-रेशन कार्ड डाउनलोड करता येईल.

शासनाकडून अंत्योदय, अन्न सुरक्षा व शेतकरी अशा तीन वेगवेगळ्या योजनेतून धान्य दिले जाते. यासाठी पिवळी, केसरी अशा वेगवेगळ्या रंगाचे रेशनकार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. विभक्त कुटुंबांमुळे रेशनकार्डाची मागणी वाढल्याने सरकारकडून मागणीनुसार पुरवठा केला जात होता. मात्र, आता सर्वच सरकारी कामे ऑनलाइन झालेली असल्याने सरकारने रेशनकार्डची छपाई बंद करून ई- रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नवीन रेशनकार्ड मिळणार नसून, त्या ऐवजी ई- रेशनकार्ड मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. हे ई- रेशनकार्ड निःशुल्क मिळणार आहे.

Leave a Comment