पंतप्रधान सन्मान निधी योजनेत होणार आता वाढ.! आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक आठ हजार रुपये

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहेत आता शेतकऱ्यांना सहा नवे आठ हजार रुपये किसान योजनेअंतर्गत मिळू शकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला

सीतारामन येत्या १ फ्रेबुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक

वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.

सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते. सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता. केंद्र सरकारची ही सर्वांत मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

👉 इथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार शेतकऱ्यांना आठ हजार रुपये 👈

Leave a Comment