या महिलांना मिळणार या योजनेअंतर्गत 6000 रुपये लाभ; इथे करा अर्ज

Pradhan mantri matru vandana yojana आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या हि गरीब आहे, अशा गरीब कुटुंबातील पुरुषांबरोबरच महिलांना सुद्धा आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल मजुरी करावी लागते, अशा महिला जेव्हा गर्भवती असतात तेव्हा सुद्धा अगदी शेवटपर्यंत मजुरी करावी लागते

अशा अडचणीमुळे अशा महिलांना आणि त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला पुरेसा सकस आहार मिळत नाही, त्यामुळे अशा गर्भवती माता कुपोषित राहतात आही त्यांच्या गर्भातील बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही, त्यामुळे काहीवेळा गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याच्या घटना सुद्धा घडतात

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 

येथे क्लिक करा 

तसेच प्रसुतीनंतर सुद्धा मातेला आणि बाळाला सकस आहार देण्याची परिस्थिती नसल्यामुळे मातेच्या आणि बाळाच्या शरीराचा पाहिजे तसा विकास होत नाही, परिणामी दोघांचेही आरोग्य खराब झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो

अशा महिलांना आपल्या गरोदरपणात स्वतःसाठी पुरेसा सकस आहार मिळवा यासाठी शासनाने १ जानेवारी २०१७ रोजी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना (Pradhan mantri matru vandana yojana maharashtra) सुरु केली आहे, या योजनेतून गर्भवती महिलांना ६००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो, हि योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत राबवली जाते. यामध्ये केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाट असतो

गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातांना त्यांची रोजगाराची भरपाई मिळून तिला आराम मिळवा, बाळाला आणि मातेला पुरेसा सकस आहार मिळून कुपोषण होऊ नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

योजनेच्या अटी

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय वर्हे १९ पूर्ण असणे आवश्यक आहे

१ जानेवारी २०१७ किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल

एका लाभार्थीला या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल Pradhan mantri matru vandana yojana maharashtra

योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर जर गर्भपात झाला असेल तर नंतर च्या गर्भधारणेत उर्वरित हप्ते मिळू शकतात

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment