सरकार देणार शेतकऱ्यांना 75 हजार रुपये; इथे बघा कोणते शेतकरी असणार पात्र

नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करणे आणि २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन २०२५’ या अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. या दिशेने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि कोणत्याही अडचणीशिवाय वीज वापरण्यासाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवून दिवसा वीज पुरवेल.

या योजनेच्या यशस्वीते नंतर ग्राहकांसाठी विजेचा दर देखील कमी राखण्यास त्याची मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राळेगणसिद्धी आणि कोळंबी या दोन ठिकाणी ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ही योजना टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये महाउर्जा आणि महावितरण या दोन्ही कंपनीचा सहभाग असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महानिर्मितीमार्फत राज्यातील ११ के.व्ही. ते १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या ५ कि.मी ते १० कि.मी परिसरामध्ये शासकीय जमिनीची उपलब्धतेचा शोध घेतला जाईल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment