SBI बँक खातेधारकांसाठी मोठी माहिती.! 1 एप्रिल पासून बँक करणारा हा मोठा बदल

नमस्कार मित्रांनो बँकेच्या सेवेसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त शुल्क आकारावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने नेमका काय निर्णय घेतला आहे? याचा ग्राहकांवर किती परिणाम होईल याची सविस्तर माहिती एका क्लिकवर पाहूया.

हे सुद्धा वाचा मोदी सरकार देणार आता पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे बघा अर्ज कसा करायचा

 

SBI ने ATM डेबिट कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने या कार्डच्या वापरासाठी वार्षिक देखभाल शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा ७५ रुपये जास्त द्यावे लागतील. हा नवा नियम नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान, बँकेने हा निर्णय घेऊन देशातील लाखो ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, एसबीआयच्या या नव्या नियमाचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. सध्या, क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डवर जीएसटीसह 125 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, 1 एप्रिलपासून त्यात 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता 200 रुपये मोजावे लागणार आहेत.

युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड आणि माय कार्ड इमेज कार्डची किंमत सध्या जीएसटीसह 175 रुपये आहे. मात्र आता त्यातही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2024 पासून तुम्हाला या कार्डसाठी 250 रुपये द्यावे लागतील.

सध्या, प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी ग्राहकांना जीएसटीसह 250 रुपये भरावे लागतात. मात्र आता तुम्हाला जीएसटीसह ३२५ रुपये भरावे लागणार आहेत. हा नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

Leave a Comment