शिंदे सरकारने दिली महिलांना खुशखबर.! या महिलांना सरकार देणार स्मार्टफोन

नमस्कार मित्रांनो अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात येत आहेत. त्या अंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ६४० अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे लवकरच वितरण केले जाणार आहे. त्याद्वारे गरोदर माता आणि बालकांच्या लसीकरणाची माहिती जि. प. च्या मुख्य कार्यालयाला मिळू शकणार आहे.
काही वर्षांपूर्वी देखील अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन देण्यात आले होते. आता नव्याने राज्य शासनाकडून राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल देण्यात येणार आहे. सर्वच विभागांमध्ये आता ऑनलाइन पद्धतीने कामकाज केले जाते. त्यात अंगणवाडी सेविकांचे काम हे फिल्डवरच अधिक असते. त्यामुळे मोबाईलच्या सहाय्याने कोणत्याही ठिकाणावरून मुख्य कार्यालयाला माहिती पुरविणे सोपे होत जाते.

👉 हे सुद्धा बघा लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार एक लाख पाच हजार रुपये इथे करा अर्ज 👈

अंगणवाडी सेविकांवर आता अनेक प्रकारच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात पूरक पोषण आहार, औषधी वाटप, वेळोवेळी गरोदर माता आणि बालकांचे वजन घेणे, लसीकरण, पूरक आहार यासह इतर कामांचाही समावेश आहे.

रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी मिळणार स्मार्ट फोन
यासाठी ठरणार फायद्याचा.. शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये
शासनाचे अनेक अॅप इन्स्टॉल जिल्ह्यात तीन हजारहून अधिक असतील. एकात्मिक बाल विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची रिअल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट फोन दिले जात आहेत.

सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. अनेक दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता, असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी सेविकांना करावी लागते. मात्र, स्मार्ट फोनमुळे वेळेची बचत होणार असून, अंगणवाडी सेविकांनी आपली माहिती तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बघता येणार आहे.
सेविकांना मिळणार स्मार्ट फोन जिल्ह्यात ३ हजार ६४० अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना स्मार्टफोन दिला जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच शासनाकडून राज्यभरातील सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप केले जाणार आहे.
अंगणवाडी सेविकांवर गरोदर मातांचे सर्वेक्षण, कुपोषणाची स्थितीची माहिती घेणे, बालकांचे वजन करणे, लसीकरणाची जबाबदारी, पूरक आहार वितरणासह इतर कामांची जबाबदारी असते. या सर्व कामांचा अहवाल तालुका, जिल्हास्तरावर पाठवावा लागतो. स्मार्ट फोनमुळे हे काम सोपे होणार आहे.

Leave a Comment